भाजप खासदार सुजय विखे पाटील कोरोनाबाधित


अहमदनगर – भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून खासदार सुजय यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

सुजय विखे पाटील यांचे वडील व भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील 30 डिसेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. कोरोना रिपोर्ट आल्यानंतर खासदार सुजय विलगीकरणात गेले आहेत. आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही, परंतु खबरदारी म्हणून मी स्वतः विलगीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी, अशी माहिती खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.