काय आहे ‘फ्लोरोना’ आणि त्याची लक्षणे ?


नवी दिल्ली – एकीकडे संपूर्ण जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट कायम असताना आता फ्लोरोनाचा आजाराचा धोका समोर आला आहे. कोरोना आणि इन्फ्लूएंझाचा दुहेरी संसर्ग फ्लोरोना हा आजार असल्याचे सांगितले जात आहे. पण अद्याप या आजारबाबत सविस्तरपणे माहिती नाही. संसर्गाचा हा नवीन प्रकार इस्रायलमध्ये आढळून आला आहे. याचे वर्णन कोरोनाव्हायरस आणि इन्फ्लूएंझा यांचे मिश्र स्वरूप म्हणून केले जात आहे. वृत्तपत्रात या संसर्गाबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, फ्लोरोना नावाचा संसर्ग इस्त्राइलमधील एका गर्भवती महिलेमध्ये आढळला आहे. या महिलेला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही फ्लोरिना काही नवीन आजार किंवा नवीन प्रकार नाही. प्लोरोना हा कोरोना आणि एन्फ्लूएंझाचा डबल इन्फेक्शन असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये, बाधिताला कोरोनासह इन्फ्लूएंझा व्हायरसचा संसर्ग होतो, ज्यामुळे हा संसर्ग कोरोनापेक्षा दुप्पट धोकादायक बनू शकतो. मार्च 2020 मध्ये जगात कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर प्रथमच असा संसर्ग दिसून आला आहे.

इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गामुळे न्यूमोनिया, मायोकार्डिटिस यासारखी अनेक गंभीर लक्षणे उद्भवतात. ज्यामुळे काहीवेळा बाधिताचा मृत्यू होऊ शकतो. यामुळे न्यूमोनियासह इतर श्वसनास त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे योग्य उपचार न मिळाल्यास रुग्णाच्या मृत्यूचा धोका खूप वाढतो. याबाबत इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने आणि रोग नियंत्रण केंद्रांनी एक चेतावणी जारी केली आहे की हा संसर्ग वेगाने पसरू शकतो किंवा गेल्या एका आठवड्यापासून पसरत आहे. 1800 हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.