अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने नवा रेकॉर्ड रचत जगभरात कमावले ‘एवढे’ कोटी


काही दिवसांपूर्वी सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने आता जगभरात किती कमाई केली आहे हे समोर आले आहे.


चित्रपटाच्या कमाई बाबतची माहिती ‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर देण्यात आली आहे. जगभरात या चित्रपटाने जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली करत नवा रेकॉर्ड रचला आहे. २०० कोटींची कमाई चित्रपटाने भारतात केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘२०२१मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट. या चित्रपटाने जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०२२मध्ये देखील चित्रपट चांगली कमाई करेल अशी आशा आहे’ या आशयाची पोस्ट करण्यात आली आहे. १७ डिसेंबर २०२१मध्ये ‘पुष्पा’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आयटम सॉंग देखील केले आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदीमध्ये रिलीज झाला असून चित्रपटाने जवळपास २३.२३ कोटी रुपये कमावले आहेत.