इंडेनने आणला एक्स्ट्रा तेज सिलेंडर

इंडियन ऑइलने व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रातील ग्राहकांसाठी खास सिलेंडर पेश केला असून एक्स्ट्रा तेज असे याचे नामकरण केले आहे. या सिलेंडरच्या वापरामुळे ५ टक्के इंधन बचत होणार आहेच पण अतिशय वेगाने उष्णता मिळाल्याने पदार्थ कमी वेळात शिजणार आहेत. या सिलेंडरचा रंग निळा असून तो घरगुती वापरासाठी नाही असेही स्पष्ट केले गेले आहे. मोठ्या प्रकल्पात त्याचा वापर करता येईल.

या सिलिंडर मधून अधिक प्रेशरने गॅस बाहेर येतो त्यामुळे पदार्थ शिजवण्यात १४ टक्के वेळ वाचतो. पण यांचे प्रेशर जास्त असल्याने तो घरगुती वापरासाठी योग्य नाही. या सिलिंडरच्या लो फ्लेम चे तापमान सुद्धा ६५ डिग्री असते. १९, ४७.५ आणि ४२.५ किलो पॅक मध्ये तो उपलब्ध आहे आणि वितरकाकडून सहज खरेदी करता येणार आहे. सध्या काही निवडक शहरात तो मिळणार असला तरी लवकरच देशभर तो उपलब्ध होईल.

इंडिअन ऑईलने व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची कॅलीसिफीक व्हॅल्यू वाढवून उच्च तापमान एलपीजी सिलेंडर एक्स्ट्रा तेज नावाने आणला आहे. कॅलीसिफीक व्हॅल्यू वाढविण्यासाठी त्यात अॅडीटिव्ह मिसळले गेले आहे. याचा पायलट प्रोजेक्ट दोन वर्षापूर्वी कर्नाटक मध्ये सुरु झाला होता. दीर्घ काळ संशोधनातून हा सिलिंडर तयार केला गेला आहे असे सांगितले गेले आहे.