२०२२ वर्ष असणार शनीचे वर्ष

गेली दोन वर्षे करोना मुळे जगात हाहाकार माजला असला तरी नवे २०२२ नव्या आशा आणि उमेदी घेऊन उगवले आहे. हे वर्ष अनेक कारणांनी वेगळे म्हणता येईल. मुख्य म्हणजे हे वर्ष शनी वर्ष आहे. म्हणजे वर्षाचा पहिला दिवस शनिवारने सुरु झाला तसा वर्षाचा शेवट सुद्धा शनिवारने होणार आहे. इतकेच नाही तर जानेवारी, एप्रिल, जुलाई, ऑक्टोबर, डिसेंबर हे पाच महिने पाच शनिवार घेऊन येत आहेत. २०११ सालानंतर प्रथमच अशी स्थिती आली आहे.

या वर्षात १७ सण उत्सव शनिवारीच येत आहेत. त्यात वसंत पंचमी, गुढीपाडवा, हनुमान जयंती, धनत्रयोदशी, पितृपक्ष अश्या सणांचा समावेश आहे. ज्योतिष शास्त्राप्रमाणे १९९३ नंतर शनी प्रथम स्वराशीत म्हणजे कुंभ राशीत येत आहे ही शुभ स्थिती आहे. पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र यांच्या म्हणण्यानुसार १ एप्रिल रोजी नवीन हिंदू वर्ष सुरु होत आहे त्याचा राजा शनीदेव आहे. धन आणि पाउस यांचा स्वामी शनी असल्याने त्याचा शुभप्रभाव राहील. प्रगतीच्या संधी मिळतील. छोटे उद्योग, स्टार्टअप यशस्वी होतील. दलित वर्गाला प्रतिष्ठा मिळेल, शेतकरी, मजूर यांच्यासाठी चांगले रोजगार उपलब्ध होतील. नवीन संवस्तराचा राजा शनी असल्याने सर्वच राशींवर त्याचा प्रभाव राहणार आहे.