काल दिवसभरात 16 हजार 764 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर ओमायक्रॉनबाधितांची संख्या 1270 वर


नवी दिल्ली – देशात प्राणघातक कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. त्याचबरोबर कोरोनाचा सर्वात धोकादायक व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाचे 16 हजार 764 नवीन बाधित आढळले आहेत. तर, 220 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात कोरोनाच्या ओमिक्रॉनचे 1,270 रुग्ण सापडले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 91 हजार 361 झाली आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 81 हजार 80 झाली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 7585 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 42 लाख 66 हजार 363 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.

त्याचबरोबर देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 144 कोटींहून अधिक अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. तर काल 66 लाख 65 हजार 290 डोस देण्यात आल्यानंतर आतापर्यंत 142 कोटी 54 लाख 16 हजार 714 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

आतापर्यंत देशात 1270 लोकांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे. देशातील 23 राज्यांमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आहेत. यानंतर केरळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 450, दिल्लीत 320 आणि केरळमध्ये 109 लोकांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे.