जनतेने जिल्हा बँक ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात दिली; नारायण राणे


सिंधुदुर्ग : भाजपने राज्याचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवले आहे. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक लोकांनी दिली असल्याची प्रतिक्रिया त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली आहे. ही सत्ता माझी नाही, तर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सर्व कार्यकर्ते आणि नितेश राणे यांनी घेतलेली मेहनत कामाला आल्याचेही त्यांनी म्हटले.

या निवडणुकीत भाजप नेते राजन तेली यांचा पराभव झाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे त्यावर बोलताना म्हणाले की, आमची दिल्लीपर्यंत सत्ता असल्यामुळे जिल्हा बँकेत पराभव झालेल्या राजन तेलींची वर्णी लावू, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात भाजपची सत्ता आणणार असल्याचे नारायण राणे यावेळी म्हणाले. राज्यात भाजपची सत्ता हवी असून ‘लगान’ची टीम नको असा टोलाही त्यांनी लगावला आहे.