केंद्र शासनाच्या ‘स्टँड अप इंडिया’ योजनेत अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याबाबत आवाहन


मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. मासाका/2018/प्रक्र. 259 (2)/अजाक, 08 मार्च, 2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्यामधील 25% मधील जास्तीत जास्त 15% मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

योजने बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य, शासन निर्णय क्र. मासाका /2018/प्रक्र. 259(2)/अजाक, 08 मार्च, 2019 मध्ये प्रस्ताव सादर करण्याबाबत सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयामध्ये नमूद माहितीनुसार सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, चेंबूर, 400071 यांच्या कार्यालयामध्ये योजनेच्या लाभाकरीता अर्ज सादर करावा.

अर्ज करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई 400071 दुरध्वनी 022-25222023, ईमेल आयडी acswomumbaisub@gmail.com या पत्त्यावर अर्ज करावा, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.