होंडा, टोयाटोची डिलिव्हरी अश्याही अवस्थेत

सध्या भारतात त्यातही उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र ही थंडी उकाडा वाटावी असे काही फोटो सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाले असून हे फोटो रशियातील आहेत. एक जहाज डिलिव्हरी देण्यासाठी घेऊन येत असलेल्या कार्स संदर्भातले हे फोटो उणे १९ तापमानात घेतलेले आहेत. कार्स पूर्णपणे बर्फाने झाकल्या गेल्याचे हे फोटो असून कार्स बर्फापासून बनल्या असाव्यात असा भास त्यात होतो आहे.

जपानच्या होंडा आणि टोयोटा कंपनीच्या शेकडो कार्स सी ऑफ जपान मधून रशियाच्या व्लादीवोस्टोक येथे पाठविल्या गेल्या आहेत. रशियात पोहोचेपर्यंत समुद्रातील अति थंड वाऱ्यांमुळे त्या कार्सवर बर्फाचे थरच्या थर चढले आहेत. जपान आणि रशिया मध्ये रस्ता जवळ आहे पण व्यापार मात्र समुद्र मार्गानेच होतो. रशियाच्या या भागात सेकंडहँड जपानी कार्सना मोठी मागणी आहे. त्यामुळे जपान मधून रोरो कार्गो मधून या कार्स रवाना केल्या गेल्या. रशियाच्या या भागात प्रचंड थंडी असते. त्यामुळे बर्फाने झाकलेल्या अवस्थेत कार डिलिव्हरी साठी येणे ही रशियासाठी नेहमीची बाब आहे.

कार्स डीलीव्हर करण्यापूर्वी सेलर्स हातोड्याने त्यावरचे बर्फ फोडतात. फायर हायड्रंटचा वापर सुद्धा केला जातो. त्यात कार अनेकदा डॅमेज होतात पण त्याला अन्य काही पर्याय नाही असे सांगितले जाते.