वनप्लस १० प्रो ची फीचर्स लिक

चीनी स्मार्टफोन कंपनी वन प्लसच्या आगामी १० प्रोच्या लाँचिंगची चर्चा होऊ लागली असतानाचा कंपनीचे सीईओ पिट लाऊ यांनी वनप्लस १० प्रो नवा अपकमिंग स्मार्टफोन असेल असा खुलासा केला आहे. गिकबेंचमध्ये हा फोन लिस्ट केला गेला असल्याचा आणि तेथे त्याचे फोटो पहिल्याचा दावा केला जात आहे. ९१ मोबाईलच्या रिपोर्टनुसार टीप्स्टर मुकुल शर्मा यांच्या म्हणण्यानुसार मॉडेल नंबर एनई २२१० खाली वनप्लस १० प्रोचे लिस्टिंग केले गेले आहे.

लिक झालेल्या फीचर्स नुसार या फोनला १२ जीबी रॅम दिली जाईल आणि तो अँड्राईड १२ ओएस सह असेल. त्याला लेटेस्ट स्नॅपड्रॅगन ८ जेन १ प्रोसेसर दिला जाईल. ६.७ इंची कर्व्हड क्यूएचडी प्लस एलटीपीओ एमोलेड डिस्प्ले, ५१२ जीबी इंटर्नल स्टोरेज, ट्रिपल रिअर कॅमेरा सेट दिला जाईल. किमतीबाबत माहिती मिळू शकलेली नसली तरी हा फोन ४० ते ५० हजार रुपये या रेंज मध्ये असेल. अनेक कलर ऑप्शन सह तो सादर केला जाईल असेही सांगितले जात आहे.