राज्यात ओमिक्रोनचा पहिला बळी पिंपरीत

भारतात करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रोन वेगाने फैलावत असतानाचा महाराष्ट्रात ओमिक्रोनचा पहिला बळी पिंपरी चिंचवड मध्ये नोंदला गेला आहे. ५३ वर्षाची ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी नायजेरिया येथून परतली होती. त्यांना गेली १३ वर्षे मधुमेह होता. काही दिवसांपूर्वी त्यांची  तब्येत बिघडली तेव्हा त्यांना येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले गेले होते. २८ डिसेंबरला त्यांचा हार्ट अॅटॅक ने मृत्यू झाला होता. त्यांचे सँपल गुरुवारी जीनोम सिक्क़ेन्सिंग साठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू परीक्षण संस्थेकडे दिले गेले होते. त्याचा रिपोर्ट नुसताच आला असून त्यात ही व्यक्ती ओमिक्रोन पॉझीटीव्ह असल्याचे सिद्ध झाले असे सांगितले जात आहे.

दरम्यान करोना चाचणी रिपोर्ट येण्यापूर्वी महाराष्ट्र सरकार आरोग्य विभागाने रुग्णाचा मृत्यू नॉन कोविड असल्याचे सांगितले होते. राज्य स्वास्थ्य विभागाने एनएआयचा चाचणी अहवाल आज आला आणि तो ओमिक्रोन पॉझीटीव्ह आला हा योगायोग असल्याचे म्हटले आहे. राज्यात करोना केसेस पुन्हा वाढत आहेत. त्यात ओमिक्रोन संक्रमितांची संख्या गुरुवारी १९८ वर गेली असून एकूण संख्या ४५० वर गेली आहे. देशात ओमिक्रोन बाधितांची संख्या १००२ वर आहे. मुंबईत करोनाच्या ११३६० अॅक्टीव्ह केसेस आहेत. गुरुवारी सापडलेल्या १९८ ओमिक्रोन संक्रमितात ३० व्यक्ती परदेशातून आलेल्या आहेत.