आता सहकार विभागाने दिला नितेश राणेंना धक्का


मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांच्यासमोरील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसत आहे. एकीकडे कणकवली पोलिसांच्या अटकेच्या कारवाईची टांगती तलवार असतानाच दुसरीकडे नितेश राणे यांच्यावर सहकार विभागाने कारवाई केली आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येलाच सहकार विभागाने भाजप प्रणित पॅनलला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीसाठी आमदार नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. जिल्हा बँकेकडून सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने १६ कोटी रुपये कर्ज घेतले होते. हे कर्ज थकीत असल्यामुळे सहकार विभागाने नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे.

जिल्हा बँकेचे १६ कोटी रुपयांचे नितेश राणे हे थकित कर्जदार असल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. एका बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेत भाजपप्रणीत पॅनल लढत असताना दुसऱ्या बाजूला आमदार नितेश राणे हे थकित कर्जदार असल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क नाकारला गेला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आज निवडणूक होत असून ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी केली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने देखील मोर्चे बांधणी केली आहे. परंतु भाजपला मोठा धक्का बसला आहे. ज्या संस्थेचे आमदार नितेश राणे सदस्य आहेत, त्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून कर्ज रुपी घेतलेले १६ कोटी रुपयांची परतफेड केली नसल्यामुळे सहकार विभागाने नितेश राणेंना मतदानाचा अधिकार नाकारला आहे. भाजपकडून जिल्हा बँकेसाठी उमेदवार म्हणून नितेश राणेंचे नाव चर्चेत होते. पण नितेश राणे यांना मतदानाचा हक्क नाकारला गेल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणेंना व भाजपला मोठा धक्का बसला आहे.