मुलीच्या विवाहवयाचा कायदा लागू होण्यापूर्वी मुस्लीम मुलींच्या निकाहची लगबग
मुलींच्या लग्नाचे किमान वय २१ वर्षावर नेण्याचा अध्यादेश संसदेत मंजूर झाल्यावर त्याचे कायद्यात रुपांतर होण्यापूर्वी मुस्लीम समाजातील मुलींचा निकाह करण्याची एकच गडबड सुरु झाली आहे. हैद्राबाद येथील मशिदीत लोक रांगा लावून मुलींचे निकाह उरकत असल्याचे दृष्ट दिसू लागले आहे. नवा विवाह कायदा सर्व जाती धर्मासाठी लागू राहणार आहे.
हैद्राबाद मध्ये पुढच्या वर्षात होणारे नियोजित असलेले मुस्लीम मुलींचे विवाह आताच उरकण्याची जणू चढाओढ सुरु झाली आहे. नवा विवाह वय कायदा मुस्लीम समाजासाठी बाधा ठरू शकतो असे मौलवी सांगत आहेत. त्यामुळे कायदा लागू होण्यापूर्वी विवाह उरकले जात आहेत. यातील बहुतेक मुली १८ ते २० वयोगटातील आहेत असेही समजते.
या संदर्भात अनेक मुस्लीम कुटुंबांशी केल्या गेलेल्या चर्चेतून आर्थिक कारणामुळे विवाह पुढे ढकलले गेले होते. करोना मुळे अनेकांचे रोजगार बंद झाले, नोकऱ्या गेल्या त्यामुळे मुलीसाठी हुंडा जमविणे अवघड बनल्याने विवाह पुढे ढकलले गेले होते. पण नवीन कायदा येणार म्हटल्यावर जमेल तसे हे विवाह उरकले जात आहेत. अनेक कुटुंबात मुलींची संख्या जास्त आहे त्यामुळे मोठ्या मुलीचा विवाह होईपर्यंत धाकट्या मुलीचा करता येत नाही अशीही अडचण आहे. मुस्लीम धर्मगुरू, अमरत- ए- मिल्लत- ए- इस्लामिया तेलंगाना व आंध्र अमीर मौलाना जाफर पाषा यांच्या म्हणण्यानुसार नवा कायदा ही मुस्लीम कायद्यात घुसखोरी आहे. आमच्या कायद्याप्रमाणे मुलगी वयात आली कि विवाह करता येतो. नव्या कायद्यामुळे मुलीच्या सुरक्षेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत.