व्हिडिओ; अत्यंत साधेपणाने उद्योगपती रतन टाटा यांनी साजरा केला वाढदिवस


नुकतेच वयाच्या ८४ व्या वर्षात उद्योगपती रतन टाटा यांनी पदार्पण केले आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे रतन टाटा हे पुत्र आहेत. १९९१ साली जे.आर.डी. टाटा हे ‘टाटा सन्स’च्या चेअरमन पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर कंपनीच्या चेअरमनपदाची जबाबदारी रतन टाटा यांच्या खांद्यावर आली. यानंतर टाटा सन्सने प्रगतीची अनेक शिखरे गाठली. रतन टाटांची मेहनतच त्याला कारणीभूत आहे. टाटाने रतन टाटांच्या नेतृत्वाखाली अन्य कित्येक कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या. ‘टाटा टी’ या कंपनीने टेटले कंपनीला, ‘टाटा मोटर्स’ने जॅग्वार लँड रोव्हरला आणि ‘टाटा स्टील’ने कोरस कंपनीला आपल्या ताब्यात घेतले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला २००४ साली शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात आले.

(व्हिडीओ सौजन्य – Universal Gyan 4u)
टाटा यांची यशस्वी उद्योजक, दूरदृष्टी व्यक्ती, देशभक्त आणि सामान्यांप्रती आदर असणारी व्यक्ती म्हणून रतन ओळख आहे. त्यांनी २८ डिसेंबर रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. छोट्या केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी साधेपणाने साजरा केलेल्या वाढदिवस व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.