‘बेबी बंप’चा फोटो शेअर करत भारती सिंह म्हणाली…


भारती सिंह ही टीव्ही क्षेत्रातील सर्वात पहिली फीमेल कॉमेडियन म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर ती अतिशय लोकप्रिय आहे. २०१७मध्ये हर्ष लिंबाचियासोबत तिने लग्नगाठ बांधली. आता भारती आई होणार आहे. भारतीने सोशल मीडियावर स्वत: व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना गूडन्यूज दिली आहे. ती तिचा हा वेळ सध्या एन्जॉय करताना दिसत आहे. नुकतेच भारतीने ख्रिसमसच्या निमित्ताने एक फोटो शेअर केला आहे. सध्या तिचा हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.


सोशल मीडियावर भारती सिंह ही प्रचंड सक्रिय असते. त्याचबरोबर तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. सोशल मीडियावर ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करताना दिसते. तिने नुकताच तिचा आणि हर्षचा एक गोड फोटो शेअर केला आहे. यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. यावेळी त्या दोघांनीही लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.


भारतीने हा फोटो पोस्ट करताना चाहत्यांना विचारले, सँटा येणार की सँटी? तुम्हाला काय वाटते, लवकर कमेंट करा आणि सांगा. तिने त्यासोबत हार्टवाली इमोजी देखीलशेअर केली आहे. भारतीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांसह अनेक सेलिब्रेटींनी कमेंट केल्या आहेत.

अभिनेता करणवीर बोहराने यावर कमेंट करत मला सँटी पाहिजे, असे सांगितले आहे. तर बिग बॉसची स्पर्धक आरती सिंह हिनेदेखील सँटीची मागणी केली आहे. त्याचबरोबर अर्जुन बिजलानी यानेही मुलगी हवी, अशी कमेंट केली आहे. तसेच अली गोनी, कोरियोग्राफर टेरेन्स लुईस, गायक श्वेता पंडित आणि विंदू दारासिंह यांनीही कमेंट केली आहे.