पॅनकार्डबाबत या चुका केल्या, तर भरावा लागू शकतो १० हजारांचा दंड


नवी दिल्ली – महत्त्वाचा दस्तावेज म्हणून पॅन कार्डचा वापर केला जातो. पॅन कार्डचा वापर बँकेत कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात आवश्यक दस्तावेज म्हणून केला जातो. या पॅन कार्डशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. आयकर विभाग पॅन कार्डवरूनच तुमची आलेली आणि व्यवहाराची माहिती तपासते. तुम्हाला जर पॅन कार्डशी संबंधित हे नियम माहित नसतील आणि तुमच्या पॅन कार्डमध्ये अनवधानाने चूक झाल्यास १०,००० रुपयांचा दंड होऊ शकतो.

दरम्यान कोणतीही फसवणूक होऊ नये, यासाठी आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करण्यात येत आहे. १० अंकी अल्फान्यूमेरिक नंबर पॅन कार्डमध्ये दिलेला असतो. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वापरलात किंवा कोणत्याही व्यवहाराच्या वेळी चुकीची माहिती भरली आणि दोषी आढळले, तर तुम्हाला या चुकीसाठी कठोर शिक्षा होऊ शकते.

तुमच्याकडे जर दोन पॅनकार्ड असतील आणि ते तपासात सापडले, तर १०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याशिवाय तुमचे बँक खाते गोठवले जाऊ शकते. हे टाळण्यासाठी तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील, तर दुसरे पॅन कार्ड तात्काळ विभागाकडे जमा करावे लागेल. यासाठी १९६१ च्या आयकर कायद्याच्या कलम २७२ बी मध्येही तरतूद आहे.

पॅन कार्ड जमा करण्याची प्रक्रिया सोपी आहे. आयआरएस वेबसाइटला भेट देऊन नवीन पॅन कार्डची विनंती किंवा/आणि पॅन डेटामध्ये बदल किंवा सुधारणा, या लिंकवर क्लिक करून फॉर्ममध्ये प्रवेश करू शकता. फॉर्म भरा आणि कोणत्याही NSDL कार्यालयात परत करा.

जर दोन पॅन कार्ड तुमच्याकडे असतील, तर तुम्हाला त्यापैकी एक जमा करावे लागेल. या श्रेणीमध्ये एकाच व्यक्तीच्या नावाने जारी केलेली आणि एकाच पत्त्यावर पाठवलेली दोन भिन्न पॅन कार्ड यांचा समावेश असू शकतो. पॅन कार्ड जमा करताना, फॉर्मसह दुसरे पॅन कार्ड सबमिट करा, तुम्ही ऑनलाइनद्वारे देखील जमा करू शकता.