‘सर्वात भ्रष्ट’ लोकांच्या यादीत अशरफ घनींचा समावेश; तर पुतीन यांच्या मित्राला मिळाला ‘करप्ट पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार


जगातील सर्वाधिक भ्रष्ट नेत्यांच्या यादीत अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांचा समावेश करण्यात आला आहे. ही यादी ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी) नावाच्या संस्थेने तयार केली आहे. जगभरातील स्वतंत्र मीडिया आउटलेट्ससाठी एक ना-नफा शोधात्मक बातम्यांचे अहवाल देणारे ओसीसीआरपी हे व्यासपीठ आहे. दरम्यान, ‘करप्ट पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मित्राला मिळाला आहे.

या यादीत बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांना पहिले स्थान मिळाले आहे. सीरियाचे हुकूमशहा बशर अल-असद, टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन आणि ऑस्ट्रियाचे चांसलर सेबॅस्टियन कुर्झ यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

ओसीसीआरपीने म्हटले आहे की, हा पुरस्कार घनी यांना देण्यात आला कारण त्यांनी आपल्या नागरिकांना संकटात सोडून देशातून पळ काढला होता. या यादीच्या न्यायाधीशांच्या समितीमध्ये संस्थेचे सह-संस्थापक ड्र्यू सुलिव्हन होते. अशरफ घनी यांच्या भ्रष्टाचार आणि अक्षमतेमुळे त्यांना ही पदवी देण्यात आल्याचे सुलिव्हन यांनी सांगितले. आपल्या लोकांना दु: ख आणि मृत्यूच्या मध्यभागी घनीने सोडले, जेणेकरून ते स्वतः यूएईमध्ये आपल्या देशातील उर्वरित भ्रष्ट अधिकाऱ्यांसह आनंदाने जगू शकतील, असे सुलिव्हन म्हणाले.

लुकाशेन्को यांना यावर्षीच्या यादीत भ्रष्टाचारावर अहवाल तयार करणार्‍या सहा पत्रकार आणि अभ्यासकांच्या पॅनेलने शीर्षस्थानी ठेवले आहे. या समितीमध्ये अरब रिपोर्टर्स फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिझमचे (एआरआयजे) महासंचालक विल फिट्जगिब्बन, इंटरनॅशनल कॉन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्सचे (आयसीआयजे) वरिष्ठ रिपोर्टर बोयांग लिम, पुलित्झर सेंटरचे वरिष्ठ संपादक लुईस शेली, जॉर्ज मेसन युनिव्हर्सिटीच्या स्कार स्कूल ऑफ पॉलिसी अँड गव्हर्नमेंटचे लेखक आणि प्राध्यापक पॉल राडू, पुरस्कारप्राप्त क्रॉस-बॉर्डर इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टर आणि ड्र्यू सुलिव्हन, ओसीसीआरपी चे सह-संस्थापक आणि संचालक यांचा समावेश आहे.

ओसीसीआरपी अहवालानुसार, १९९३ पासून बेलारूसमध्ये ६७ वर्षीय लुकाशेन्को सत्तेवर आहेत. त्यांचा निवडणुकीतील हेराफेरी, टीकाकारांचा छळ करण्यापासून ते आंदोलकांना अटक करणे, मारहाण करण्यापर्यंतच्या घटनांमध्ये सहभाग आहे. ओसीसीआरपी अहवालात पुढे असे म्हटले आहे की, सीरियाला विनाशकारी गृहयुद्धात असद यांनी नेले आणि सत्तेत असताना कोट्यावधी डॉलर्स लुटले. एर्दोगान हे एका भ्रष्ट सरकारवर देखरेख करतात ज्यांनी सरकारी मालकीच्या बँकांचा वापर करून इराणी तेलासाठी चिनी पैशाची लाँड्रिंग केली आहे. कुर्झ हे ऑस्ट्रियन पीपल्स पार्टीचे (ओवीपी) नेते होते, ज्यांच्यावर वृत्तपत्र घोटाळा आणि लाचखोरीचा आरोप होता.