पुन्हा एकदा गूड न्यूज देणार हार्दिक आणि नताशा ?


मुंबई – सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या चर्चेत असतो. हार्दिक सध्या ख्रिसमस साजरा करतानाचे फोटो शेअर केल्यामुळे चर्चेत आहे. या फोटोवरुन हार्दिक पुन्हा बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ख्रिसमसच्या दिवशी काही फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तो पत्नी नताशा स्टॅन्कोविक आणि मुलगा अगस्त्यसोबत दिसत आहे. दरम्यान, पांड्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तर नताशाने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये नताशा प्रेग्नंट असल्याचे दिसत आहे. पण याबाबत नताशा किंवा हार्दिकने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.


दरम्यान २०१९ मध्ये हार्दिकच्या पाठीला दुखापत झाली होती, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. तेव्हापासून हार्दिकला पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करता आलेली नाही, त्यामुळे त्याचा फटका त्याला सहन करावा लागत आहे. हार्दिकला दुखापतीमुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे. पूर्वीप्रमाणे तो गोलंदाजी करू शकत नाही आणि आयपीएल २०२१ आणि टी-२० विश्वचषकातील त्याची कामगिरी खराब झाली आहे. हार्दिकला गेल्या एका वर्षात एकदिवसीय आणि टी-२० मध्ये एकूण ४६ षटके टाकता आली आहेत, ती देखील त्याची गोलंदाजी तितकी मजबूत नसल्यामुळेच हार्दिक संघाबाहेर आहे.

सध्या आपल्या फिटनेसवर हार्दिक काम करत असून वृत्तानुसार तो विजय हजारे ट्रॉफी खेळणार नाही. हार्दिकसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे कारण पुढील दोन वर्षात टीम इंडियाला टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. हार्दिक फिट नसेल, तर त्याचे आणि टीम इंडियाचे मोठे नुकसान होऊ शकते.