व्हिडीओ ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली देशातील सर्वात वेगवान मेट्रोतून सफर


कानपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर आज मेट्रोतून फेरफटका मारला. त्यांच्यासोबत यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित होते. त्यांनी मेट्रोने प्रवास करत आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगर असे अंतर पार केले. या मेट्रोचा आणखी एक भाग जानेवारी २०२२ मध्ये खुला होणार असल्याची माहिती मिळत आहे.


कानपूर मेट्रो प्रकल्प हा देशातील सर्वाधिक वेगवान मेट्रो प्रकल्प आहे. शहरात होणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या अगदी काही आठवड्यांपूर्वीच या प्रकल्पाचे उद्धाटन झाल्यामुळे याचा फायदा निवडणुकीतही होणार हे निश्चित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील अनेक कामांची पाहणी तसेच उद्घाटन केले. त्यांनी काही दिवसांपूर्वीच गंगा एक्सप्रेसवे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पायाभरणी केली.

आज कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले. या मेट्रो प्रकल्पाचे काम गेली दोन वर्षे सुरू होते. उत्तर प्रदेशात त्यांनी प्रथम आयआयटी कानपूरच्या पदवीदान समारंभाला हजेरी लावली.