नागपुरात या तारखेला होणार राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन


मुंबई – नागपुरात २८ फेब्रवारी रोजी राज्याचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहेत. आज राज्य सरकारकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णयराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

नागपुरात पुढील अधिवेशन घेण्यात यावे, अशी मागणी सातत्याने समोर येत होती. यंदाचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईत होत असल्यामुळे ही मागणी अधिकच जोर धरत होती. आज विधीमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक ही पार पडली. या बैठकीत आगामी अधिवेशनाबाबत चर्चा झाली.

सत्तेवर ठाकरे सरकार आल्यापासून नागपुरात अधिवेशन होत नसल्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांकडून टीका टिप्पणी सुरू होती. शिवाय, महाविकास आघाडीमधील एक प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसकडूनही नागपुरात अधिवेशन व्हावे, अशी मागणी केली जात होती. अखेर ही मागणी आता मान्य झाल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य सरकारची अधिवेशाच्या संदर्भातील भूमिका बोटचेपी दिसत आहे. त्यांना प्रश्नांना सामोरे जायचे नाही, हे स्पष्ट दिसत आहे. नागपूरात दोन वर्षे अधिवेशन झाले नाही. विदर्भातील लोकांची फसवणूक झाल्याचे त्यांना वाटत आहे. मुख्यमंत्री प्रवास करू शकत नाही, त्याबाबत सरकारने विनंती केल्यामुळे आम्ही सकारात्मक भूमिका घेतली. पण अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूरला घेण्याची मागणी आम्ही केली आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन अधिवेशन नागपूरला घेण्याचे आश्वासन सरकारने दिले असल्याचे फडणवीस यांनी आज सांगितले होते.