पीएचडी होईल एवढे गोंधळ महाविकास आघाडी सरकारने केले – चंद्रकांत पाटील


मुंबई : राज्यपालांच्या अधिकाराबाबत बोलू शकत नाही. राज्यपालांना उलटसुलट बोलायचा अधिकार महाविकास आघाडीचा आहे. नियमांमध्ये बदल करून तुम्ही तारीख मागत आहात. दोनदा पत्र देऊन देखील तुम्ही विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतली नसल्याचे असे करणे त्यांनी राज्यपालांचा किंबहूना घटनेचा अपमान केला आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रपती राजवट सुद्धा लागू शकते, असे म्हटले आहे. राज्यपाल हे स्वायत्त पद आहे, त्यांनी काय करायचे हे तेच ठरवतील, असे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार हा प्रश्न असून वर्षभरापासून निवडणुका प्रलंबित आहेत. ओबीसी आरक्षणमुळे 6 जिल्हा परिषदामधील निवडणूका रद्द झाल्या. राज्य सरकार सगळे गोंधळ करत आहे. पेपर फुटी, शाळा सुरू करणे, एसटी संप असे अनेक मुद्दे आहेत. या सरकारने पीएचडी होईल एवढे गोंधळ केले आहेत. आता निवडणूका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने जे कारण दिले होते. ते न्यायालयात टिकेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असल्याचे म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कृत्रिम रित्या सरकार तयार झाल्यानंतर ते कसे वापरायचे, हे त्यांच्या हातात आहे. नारायण राणे यांना अटक केली, पुढे काय झाले. न्यायालयाने त्यांना फटकारले. आता त्यांच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे ते पुढे काय करतील, हे सांगता येत नाही. पण आमचा न्यायालयावर विश्वास असल्याचे ते म्हणाले.

पाटील यांनी म्हटले की, गोपीचंद पडळकर यांच्या हल्ल्याची क्लिप व्हायरल झाली आहे. यावरून सर्व नागरिक असुरक्षित आहेत, अशी परिस्थिती आहे. जर आमदारांची ही परिस्थिती असेल तर मग सर्वसामान्य नागरिकांची काय परिस्थिती असेल. आम्ही विधानसभा आणि विधानपरिषदेत विषय मांडणार असल्याचे ते म्हणाले.