राज्याच्या हिवाळी अधिवेशनात आत्तापर्यंत 35 जणांचा कोरोनाची लागण


मुंबई – सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासोबतच ओमिक्रॉनबाधितांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच सध्या राज्यात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. कोरोनाने अधिवेशनातही शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत राज्याच्या हिवाळी अधिवेशनात 35 जणांचा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 2 हजार 300 जणांची अधिवेशन सुरु झाल्यापासून कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 35 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात पोलीस कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान, वेगाने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय ठरला आहे. अशातच विधानसभा अध्यक्षांपदाच्या शर्यतीत असलेले के. सी. पाडवी यांच्याही नावाचा समावेश आहे. एकूण 35 जणांना गेल्या 2 दिवसांत कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 हजार 300 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या गेल्या 2 दिवसांत करण्यात आल्या होत्या. यामध्ये मंत्री के. सी. पाडवी, 3 पत्रकार, पोलीस कर्मचारी, विधिमंडळ आणि मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अधिवेशासाठी के. सी. पाडवी उपस्थित होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत. बीएमसी कर्मचारी आज त्यांच्या घरी जाऊन पुन्हा त्यांची कोरोना चाचणी करणार आहेत. त्यांना कोणतीही लक्षणे जाणवत नसून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळत आहे. याव्यतिरिक्त भाजप आमदार समीर मेघे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वीही अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ज्यावेळी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या होत्या 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.