कोरोनामुक्त होताच पुन्हा सुरु झाल्या करीनाच्या पार्ट्या !


बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी करीना कपूर खान ही एक अभिनेत्री आहे. करीनाची कोरोना टेस्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, करीनाच्या कोरोना टेस्टचा रिपोर्ट येण्याआधी तिने अनेक पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. करीनासोबत या पार्टीमध्ये मलायका अरोराची बहिण अमृता अरोरा देखील दिसली होती. करीनानंतर अमृताची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, आता करीना आणि अमृताची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

दरम्यान आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून करीनाने अमृता सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत करीना आणि अमृता ग्लॅमरस दिसत आहे. हा फोटो शेअर करत आम्ही परत आलो आहोत. करीनाने शुक्रवारी तिची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचे सांगितले होते. आता कोरोनातून बाहेर आल्यानंतर करीनाने पुन्हा एकदा पार्टी करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करीना दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.