सलमान खानला सर्पदंश, स्वतः शेअर केला अनुभव

बॉलीवूड दबंग सलमान खान याला त्याच्या फार्महाउसवर विषारी साप चावल्याने रुग्णालयात दाखल केले गेल्याची बातमी असून सहा तासानंतर सलमानला घरी सोडले गेल्याचे समजते. सलमानच्या वाढदिवसाच्या अगोदर एक दिवस ही घटना घडल्याची बातमी पीटीआयने दिली आहे. सोशल मिडीयावर सलमानला सर्पदंश झाल्याची बातमी करोनाचा नवे व्हेरीयंट ओमिक्रोनपेक्षा अधिक वेगाने पसरली आणि सलमानचे चाहते त्याच्या तब्येतीविषयी जाणून घेण्यास उतावीळ झाल्याचे दिसून आले.

सलमानने ही घटना स्वतःच शेअर केली आहे. सलमानने सांगितले, त्याच्या फार्म हाउसमध्ये एक साप घुसला. त्याने लाकडी काठीच्या सहाय्याने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो हातावर चढला. सलमानने दुसऱ्या हाताने सापाला पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तीन वेळा सापाने त्याला दंश केला. साप विषारी होता. त्यासाठी सलमानला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे सहा तास उपचार घेतल्यावर तो घरी आला असून आता त्याची तब्येत चांगली आहे. सलमानचे वडील सलीम यांनीही सलमानची तब्येत ठीक असल्याची आणि त्याला काही धोका नसल्याची माहिती एका मुलाखतीत दिली आहे.

सलमानच्या वर्कफ्रंट बाबत बोलायचे तर तो पूजा हेगडे सोबत कभी ईद कभी दिवाळी, जॅकलीन सोबत किक टू मध्ये काम करतो आहे. आमीर खानच्या लालसिंग चढ्ढा मध्ये तो कॅमिओ करताना दिसणार आहे तसेच शाहरुखच्या पठाण मध्ये तो छोटी भूमिका साकारत आहे.