उभे राहून जेवल्याचे हे आहेत दुष्परिणाम


आपल्या संस्कृतीत जेवण हे जमीनीवर बसूनच जेवण्याची परंपरा आजवर कायम आहे. पण जसजसा काळ बदलत आहे त्याप्रमाणे ती परंपरा कालबाह्य होत आहे. आता लोक टेबल-खुर्चीवर बसून जेवायला लागले. त्यातच कमी म्हणून की काय आता लोकांमध्ये उभे राहून जेवणाचे फॅडच आले आहे.

आपल्यापैकी अनेकांकडे अनेक मंगल कार्यक्रम होत असतात त्यावेळी आपण हमखास बुफे डिनर किंवा बुफे लंचला पंसती देत असतो. पण त्यात फार कमी ठिकाणी बैठक लावून जेवण दिले जाते. पण उभे राहून जेवल्याने आपल्या शरीराचे किती नुकसान होते याबद्दल अनेकजणांना माहित नाही. आम्ही आज तुम्हाला उभे राहून जेवल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगणार आहोत.

उभे राहून जेवल्याने अपचन, लठ्ठपणा असे आजार उद्भवतात. उभे राहून जेवल्याने आपल्या शरीरातील आतड्या आकसल्या जातात आणि त्यामुळे खाल्लेले पचायला त्रास होतो. उभे राहून जेवताना आपल्या पायात बूट किंवा चप्पल असते ज्यामुळे आपले पाय गरम पडतात. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपले पाय थंड असणे महत्त्वाचे आहे.

बुफे या खाद्यपद्धतीमध्ये सारखे सारखे जाऊन जेवण घेण्यापेक्षा एकदाच काय ते जास्त ताटात वाढून घेतात. काही वेळा आपण जास्त खातो आणि त्यामुळे अॅसिडिटी आणि लठ्ठपणासारखे त्रास होतात. बसून जेवल्याने आपले मन शांत आणि एकाग्र राहते. पण उभे राहून जेवल्याने ती एकाग्रता राहत नाही.

उभे राहून जेवताना अनेकदा आपण खूप घाईत जेवतो. त्यामुळे ठसका लागणे किंवा नाकात घास जाण्यासारखे प्रकार होतात. उभे राहून खाल्याने आपल्या शरीराला योग्य ते पोषक घटकही मिळत नाही. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की तुम्ही जमिनीवर बसून जेवाल. तेच आपल्या आरोग्यसाठी फलदायी आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment