बापरे ! ही व्यक्ती तब्बल 45 वर्षांपासून खात आहे काच

मध्यप्रदेशच्या डिंडोरीमध्ये असा एक माणूस राहतो, ज्याच्याबद्दल वाचून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. येथे राहणारा एक व्यक्ती तब्बल 40-45 वर्षांपासून काच खात आहे. हो हे खरे आहे. दयाराम साहू नावाचा हा व्यक्ती मागील अनेक वर्षांपासून काच खात आहे. हा व्यक्ती वकील आहे.

दयाराम साहू यांनी दुसऱ्यांनी अशा गोष्टी न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण हे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

दयाराम साहू यांनी सांगितले की, मागील 40-45 वर्षांपासून काच खात असून, त्यांना याची सवय लागली आहे. या कारणामुळे त्यांच्या दातांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

त्यांनी सांगितले की, आता काच खाने त्यांनी हळूहळू कमी केले आहे. ते डिंडोरीच्या शाहुपरा जिल्ह्यातील आहे. त्यांना लहानपणापासूनच काच खाण्याची सवय लागली. सुरूवातीला ते असेच आवड म्हणून काच खात असे. मात्र हळूहळू त्यांना याची सवय लागली.

व्हिडीओमध्ये दिसते की दयाराम आरामशीर कारच खात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना त्यांची पत्नीच काच आणून देते. दयाराम यांच्यानुसार, आधी ते 1 किलोपर्यंत काच खात असे. मात्र दात कमकुवत झाल्याने आता त्यांनी काच खाणे कमी केले आहे. आता त्यांना ही सवय सोडायाची आहे.

Leave a Comment