यावरुन कळेल तुमचा परफ्यूम कितीवेळ टिकेल


आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या अंगाला येणारी दुर्गंधी नकोशी असते आणि ही दुर्गंधी घालवण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण नानाविविध डिओ आणि परफ्यूमचा वापर करत असतात. पण तुम्ही वापरत असलेले डिओ अथवा परफ्युम हे जास्त काळ टिकत नाही.

पण आम्ही आज तुम्हाला यासाठी काही खास टीप्स ज्याचा वापर करुन तुमच्या डिओ अथवा परफ्युमचा सुगंध दीर्घकाळासाठी टिकवू शकता. तुम्हाला जर वाटते की नेहमी तुमच्या शरीरातून सुगंध यावा तर गरम पाण्याने आंघोळ करायला सुरुवात करा. त्वचेतील छिद्र गरम पाण्यामुळे खुली होतात आणि त्यानंतर तुम्ही परफ्यूमचा वापर करू शकता. यामुळे सुगंध दीर्घकाळ टिकतो.
https://media.mnn.com/assets/images/2017/09/spraying_perfume.jpg.653x0_q80_crop-smart.jpg
शॉवर जेलचा वापर आंघोळीसाठी करा. सुगंधी साबणाचा वापर करा आणि शरीर पुसल्यानंतरच सुंगधी परफ्यूम किंवा डिओचा वापर करा. ऋतूमानानुसार परफ्यूम कपड्यांवर लावला जाऊ शकतो. हिवाळ्यात स्वेटरवर 15 ते 20 सेंटीमीटरच्या अंतरापासून परफ्यूम स्प्रे करा. आंघोळीनंतर शरीरात ओलावा कायम राखण्यासाठी सुगंधी बॉडी लोशन लावा. मऊ त्वचेवर वापरण्यात आलेला परफ्यूम दीर्घकाळ टिकतो.

Leave a Comment