या देशांचे संरक्षण दुसऱ्या देशाच्या भरवश्यावर

कोणताही देश सुरक्षेला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत असतो. यामध्ये सुरक्षेचे प्रामुख्याने दोन स्तर असतात, एक म्हणजे पोलिस आणि दुसरे असते सैन्य. पोलिसांची जबाबदारी ही देशांतर्गत सुरक्षा सांभाळण्याची असते तर सैन्य सीमा सुरक्षेवर लक्ष्य देत असते. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, काही देशांकडे स्वतःचे सैन्यच नाही. या देशांच्या सुरक्षेची जबाबदारी दुसरे देश उचलतात.

(Source)

वॅटिकन सिटी हा जगातील सर्वात छोटा देश आहे. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे सैन्य नाही. येथे आधी नोबल गार्ड असायचे. मात्र 1970 मध्ये ही संस्था बंद करण्यात आली. या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी इटालियन सैन्याची आहे.

(Source)

मॉनेको हा देखील असाच एक छोटा देश आहे. येथे 17 व्या शतकापासून कोणत्याही प्रकारचे सैन्य नाही. येथे दोन छोट्या सैनिकांच्या तुकड्या आहेत. एक तुकडी राजकुमाराचे रक्षण करते तर दुसरे सैन्याचे रक्षण करते. फ्रांसचे सैन्य या देशाचे रक्षण करते.

(Source)

मॉरिशस हा एक बहुसंस्कृती असणारा देश आहे. येथे 1968 पासून कोणत्याही प्रकारचे सैन्य नाही. मात्र येथे 10 हजार पोलिस कर्मचारी आहेत. दे देशांतर्गत आणि सीमेवरील सुरक्षेची जबाबदारी सांभाळतात.

(Source)

युरोपचे दुसरे सर्वात मोठे द्वीप आयसलँडमध्ये देखील 1869 पासून सैन्य नाही. हा देश नाटोचा सदस्य असून, याच्या सुरक्षेची जबाबदारी अमेरिकेकडे आहे.

(Source)

मध्य अमेरिकेतील कॅरेबियन भागातील कोस्टा रिका या देशाकडे देखील 1948 पासून कोणत्याही प्रकारचे सैन्य नाही. 1948 मध्ये झालेल्या गृहयुध्दानंतर, या देशाने सैन्य समाप्त केले होते. मात्र येथे देशांतर्गत सुरक्षेसाठी पोलिस कार्यरत आहेत.

 

Leave a Comment