वास्तुतील या दोषांमुळे तुम्हाला येत नाही रात्रीची गाढ झोप


आपण दिवसभर काम करुन पार थकून जातो आणि त्यातच तुम्हाला जर रात्री योग्य झोप मिळाली नाही तर त्याचा त्रास तुम्हाला दुसऱ्या दिवसी सहन करावा लागतो. आपली झोप पूर्ण व्हावी यासाठी आपल्यापैकी अनेक उपाय करतात. पण ते उपाय देखील निरार्थक ठरत असतात. यामागे वेगवेगळ्या कारणांसोबत अनेकदा वास्तुदोष हेही एक कारण असू शकते. तुम्हाला रात्री गाढ झोप वास्तुशास्त्राचे काही उपाय केल्यास घरातील दोष दूर होऊन लागू शकते.

काही उपाय वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत. या उपायांचा वापर केलास शांत झोप येईल. बेडरूमच्या वर पाण्याचा कोणताही स्त्रोत असू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. टीव्ही, कॉम्प्यूटरसारख्या गोष्टी काही लोकांच्या बेडरूममध्ये असतात. वास्तूशास्त्रात याला दोष मानले जाते. या गोष्टी चुकूनही बेडरूममध्ये ठेवू नका. यामुळे आयुष्यात अनेक संकटे येऊ शकतात.

बेडरूममधील बेडकडे विशेष लक्ष द्या. तुमचा बेड जर चुकीच्या दिशेला असेल तर त्याचा आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. बेडरूममध्ये पाणी, वाहता झरा किंवा पर्वतांचा फोटो लावू नये. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

Leave a Comment