या रेल्वे स्टेशनचे बालक कारभारी

रेल्वे स्टेशनवर काम करताना कर्मचाऱ्यांना तुम्ही अनेकदा पाहायले असेल. मात्र कधी लहान मुलांना रेल्वे स्टेशनवर तिकीट विक्री करताना, सिग्नल गार्ड म्हणून काम करताना पाहिले आहे का ? नाही ना. मात्र युरोपमधील एका देशात रेल्वे स्टेशनवर सर्व जबाबदाऱ्या लहान मुले संभाळतात.

(Source)

युरोपमधील हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील जंगलामधील एक रेल्वे स्टेशनवर सर्व कामे लहान मुले करतात. या रेल्वे स्टेशनवर सिग्नल गार्ड, तिकीट कार्यालयापासून ते तिकीट चेक करण्यापर्यंतची सर्व कामे लहान मुलेच सांभाळतात.

(Source)

या स्टेशनवर तुम्हाला ही लहान मुलं कधी युनिफॉर्ममध्ये तर कधी विना युनिफॉर्मचे काम करताना दिसतील. येथील ट्राम लाइन ही जगातील सर्वात जलद आणि जुनी ट्राम लाइन आहे. 2018 मध्ये या रेल्वे लाइनला 70 वर्ष पुर्ण झाली आहेत.

(Soucre)

या स्टेशनवर चालणारी स्पेशल रेल्वे 11 किलोमीटरचा प्रवास करते. ही रेल्वे 40 ते 50 प्रवाशांना घेऊन जाते. हे अंतर ही रेल्वे केवळ 40 मिनिटांमध्ये पुर्ण करते. अनेक लोक तर केवळ या लहान मुलांना काम करताना पाहता यावे यासाठी या रेल्वे स्टेशनला भेट देतात.

(Source)

हंगेरी सोव्हियत संघाचा एक भाग असताना येथे लहान मुलांना काम करणे आणि त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पायनियर रेल्वेची सुरूवात करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत लहान मुलेच या स्टेशनवर कार्यरत आहेत.

 

Leave a Comment