गाडीच्या मायलेजवर एसीचा परिणाम न व्हावा यासाठी काही टीप्स

सध्या सप्टेंबरचा महिना सुरू असून देखील गर्मी सुरूच आहे. कारमध्ये एसी लावल्याशिवाय एक किलोमीटर देखील जाणे शक्य नाही. अनेकजण गरज असेल तेव्हाच एसीचा वापर करत असतात. मात्र अनेकवेळा दिसून येते की, काहीजण कारमध्ये एसी सतत चालू ठेवतात. मात्र अशामुळे कारवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. जाणून घेऊया एसीचा योग्य वापर कसा कराल.

गाडी चालवत असताना एसी चालू ठेवल्याने मायलेजमध्ये केवळ एक-दोन किलोमीटरचा फरक पडत असतो. मात्र गाडीची सर्विस करायला गेल्यावर तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. यावेळी एसीचा गॅस लीक झालेला असू शकतो, अथवा कमी झालेला असतो. त्याला टॉप-अप करण्यासाठी कमीत कमी 1000 रूपये खर्च येतो. यामुळे रेग्युलर कार सर्विसिंगबरोबर एसी सर्विस देखील गरजेचे आहे.

(Source)

असा काम करतो एसी  – 

गाडीमध्ये एसी सुरू केल्यावर तेव्हा एसी अल्टरनेटरवर मिळणाऱ्या एनर्जीचा वापर करतो. ही एनर्जी त्याला इंजिनमधून मिळते. इंजिन फ्यूलचा वापर करते. खास गोष्ट अशी की, जोपर्यंत कार सुरू करत नाही, एसी देखील सुरू होत नाही. कारण, एसी कंप्रेसर बेल्ट तेव्हाच फिरेल जेव्हा कार सुरू होईल. हा तोच बेल्ट असतो, जो कारच्या अल्टरनेटरला सुरू ठेवण्यास आणि बॅटरीला चार्ज करण्यास मदत करतो. एसी कंप्रेसर कुलेंटला कंप्रेसकरून थंड करते आणि अशाच प्रकारे एसी कार्य करतो.

(Source)

हायवेवर कारच्या एसीचा असा करा वापर –

हायवेवर गाडी चालवताना कारच्या सर्व खिडक्या बंद करा. कारण कारचा वेग जास्त असल्याने हवेच्या दबावामुळे गाडीचा वेग कमी होतो आणि ज्यामुळे इंजिनची क्षमता कमी होते. विंडो बंद करून एसी सुरू करावा. अनेकवेळा लोक विंडो थोडी उघडी उघडी एसी सुरू ठेवतात. मात्र ते योग्य नाही.

(Source)

कारच्या एसीचा योग्य वापर असा करा –

जर तुमच्या कारमध्ये ऑटो एसी अथवा क्लाइमेंट कंट्रोल देण्यात आले असेल तर एसी सर्वात कमी मोडवर सुरू ठेवा. जेणेकरून, कारच्या आतील टेम्प्रेचर लवकर कमी होईल.  थोड्यावेळानंतर कारचे तापमान वाढल्यानंतर तुमच्या हिशोबाने तुम्ही ते वाढवू शकता. जर तुम्हा एसीच्या परफॉर्मेंसबद्दल काही अडचण येत असेल तर त्याचे कंप्रेशर तपासा आणि कंडेन्सर देखील साफ करा.

 

Leave a Comment