बायको माहेरी गेल्यानंतर राजा झालेला नवरा आवर्जुन करतो ही कामे


प्रेम आणि भांडणे हे तर नवरा-बायकोच्या नात्यात असतेच. नवरा-बायको एकत्र असल्यावर भांड्याला भांडे लागणार एवढे मात्र नक्की आहे. पण बायको माहेरी किंवा कोणत्या ट्रीपवर गेल्यानंतर राजा झालेल्या नवऱ्याला काय करणे सर्वाधिक आवडते हे माहीत आहे का? नवरा एकटा राहिल्यानंतर काय करतो हे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

नवऱ्याला अनेकदा बायकोच्या अनुपस्थितीत मित्रांसोबत पार्टी करण्याची आयती संधी मिळते आणि या संधीचा तो पुरेपूर फायदा घेत असतो. मित्रांना बायको घरी असताना पार्टीसाठी बोलवणे प्रत्येकवेळी शक्य होते असे नाही. पण ही संधी जेव्हा या नवरोबाला मिळते तेव्हा तो त्याचे सोने करण्याची संधी अजिबात सोडत नाही.

नवऱ्याला बायको घरी असताना वेळेत घरी यावे लागते. पण ती जेव्हा घरी नसते तेव्हा त्याला प्रश्न विचारणारे कोणी नसते. अशावेळी नवरा संधी साधत मित्र- मैत्रिणींसोबत लेट नाइट आऊटिंगचा प्लॅन करतो. बायको- मुलांसोबत फिरून कंटाळा आला असेल तर नवऱ्याला बायको माहेरी जाणे हे कोणत्याही सुट्टीपेक्षा कमी नसते. तो आपल्या मित्रांसोबत 2-4 दिवस मोठी सुट्टी घेऊन बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकतो.

टीव्हीवरून अनेकदा पती- पत्नीमध्ये भांडणे होतात. पण, घरी बायको नसेल तर नवरा त्याच्या आवडीचे चॅनल लावू शकतो. अशावेळी नवरा आरामात झोपून उठत त्याच्या आवडीचे कार्यक्रम पाहतो. स्वतःचा असा वेळ जो त्याला मिळतो तो पूर्ण एन्जॉय करतो. याहून वेगळे म्हणजे जर पत्नी घरी नसेल तर घरात एकटे राहण्यापेक्षा काही पती ऑफिसमध्ये जास्त वेळ काम करणे पसंत करतात.

Leave a Comment