या माणसाच्या डोक्यावर उगवले चक्क खरेखुरे शिंग !


नवी दिल्ली – आपण याआधी लहान मुलांच्या कॉमिक पुस्तकात किंवा चित्रपटात माणसाच्या डोक्यावर शिंग असल्याचे पाहिले असेलच. पण खऱ्या आयुष्यात एका वृद्ध व्यक्तीच्या डोक्यावर चक्क ४ फूट उंच खरेखुरे शिंग उगवले आहे.

मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील श्यामलाल यादव या वृद्ध व्यक्तीच्या डोक्याच्या मधोमध ४ फूट उंच शिंग उगवले. त्यांच्या डोक्यावर हे शिंग गेल्या ५ वर्षापासून आहे. त्यांच्या डोक्याला एका अपघातामध्ये मार लागला होता. त्याच्या डोक्यावर त्यानंतर शिंग उगवले. ते न्हाव्याकडून कापून घेतल्यानंतर ते परत उगत होते. डॉक्टरही या अनोख्या प्रकारामुळे बुचकळ्यात पडले. ते डॉक्टराकडून उपचार घेऊन देखील जात नव्हते.

जिल्ह्यातील भाग्योदय रुग्णालयातील डॉक्टर विशाल गजभीये यांना श्यामलाल यांनी आपली समस्या सांगितली. डॉक्टरांनी त्यावर ऑपरेशन करून ते कापून टाकले आहे. परत शिंग उगवले जाऊ नये म्हणून त्याजागी प्लास्टिक लावले आहे. या प्रकारे शिंग उगवले जाणे ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Leave a Comment