मिग २१च्या धातूपासून बनले हे खास घड्याळ


बंगलोर वॉच कंपनीने भारताच्या हवाई दलाच्या पहिल्या सुपरसोनिक लढाऊ विमानाच्या म्हणजे मिग २१ च्या धातूपासून बनविलेल्या घड्याळांचे नवे कलेक्शन सादर केले आहे. मिग २१ या लढाऊ विमानांनी भारतीय हवाई दलासाठी मोठे योगदान दिले असून अजूनही देत आहेत. वीरचक्र पुरस्काराने नुकतेच सन्मानित झालेले विंग कमांडर अभिनंदन यांनी मिग २१ मधूनच पाकिस्तानचे एफ १६ विमान पाडले होते. तसेच बांगलादेश स्वातंत्र युद्धात पाकिस्तानविरोधात याच मिग २१ विमानांनी मोठी कामगिरी बजावली होती.

बंगलोर वॉच कंपनीचे मालक निरुपेश जोशी आणि मर्सी अमलराज म्हणाले, दीर्घकाळ आम्ही परदेशात ज्या प्रकारे त्यांची संस्कृती, मोठी चळवळ, युद्ध याच्या स्मृती जपण्यासाठी मेम्रोबिलीय बनविले जाते त्याप्रमाणे आपण काहीतरी केले पाहिजे असा विचार करत होतो. या मोठ्या घटना कहाणीच्या रुपात सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रकार असतो. त्या विचारातून आम्ही हे घड्याळ बनविले आहे. त्यामुळे ग्राहकाशी भावनात्मक तार जुळू शकेल आणि ग्राहक ही आठवण अनेक वर्षे जतन करतील असा उद्देश आहे.


एक वर्षपूर्वी २०१३ मध्ये ५० वर्षे सेवा दिलेले हे मिग २१ निवृत्त केले गेले त्याच्या धातूचा काही भाग आम्ही मोठ्या प्रयासाने मिळविला होता. कॉकपिट स्टाईलमध्ये हे घड्याळ बनविले गेले असून मागच्या भागावर सुपरसोनिक विमानाची माहिती, ३ मिग एकत्र उडत असलेले रेखाचित्र कोरले गेले आहे. १९६३ मध्ये हे विमान हवाई दलात सामील केले गेले होते. घड्याळाचे डिझाईन कंपनीने बनविले असून घड्याळासाठीचे सुटे भाग आयात केले गेले आहेत.

या घड्याळाची ५ मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध केली गेली असून अशी एकूण २१ घड्याळे तयार केली गेली आहेत. त्याच्या किमती ४८ हजारापासून ५३ हजारापर्यंत आहेत. परदेशात राहणाऱ्या भारतीयांकडून या घड्याळाना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही जोशी यांनी सांगितले.

Leave a Comment