फुलपाखरू हा अन्टार्टीका सोडले तर जगभर आढळणारा कीटक असून अतिशय सुंदर आणि नाजूक दिसणाऱ्या या किटकाच्या डोळ्यांची क्षमता आश्चर्यवाटण्यासारखी आहे. फुलपाखराच्या डोळ्यात ६ हजार लेन्स असतात आणि त्यामुळे ती अल्ट्राव्हायोलेट ही माणसाच्या नजरेस दिसू न शकणारी किरणे पाहू शकतात. फुलपाखराचे पंख पारदर्शी असतात आणि त्यांना सर्वसाधारण चार पंख असतात. पण सर्वाधिक मोठ्या आकाराच्या फुलपाखराला १२ पंख असतात.
नाजूक साजूक फुलपाखरांची मजेदार माहिती
फुलपाखरे ऐकू शकत नाहीत पण त्यांना व्हायब्रेशन समजतात. अमेझोनच्या जंगलातील फुलपाखरे त्यांच्या शरीरातील सोडियमची कमतरता दूर करण्यासाठी कासवाचे अश्रू पितात असे सांगितले जाते. मधमाश्यांच्या प्रमाणेच फुलपाखरे फुलातील मध शोषून घेतात. फुलपाखराचे आयुष्य दोन ते चार आठवडे इतकेच असते पण काही फुलपाखरे ९ महिन्यांपर्यंत जगू शकतात.
फुलपाखरे पानावर अंडी घालतात आणि ते पान अंडी घालण्यासाठी योग्य आहे का याची तपासणी पायांनी करतात. सर्वात मोठे फुलपाखरू १२ इंचाचे आहे तर सर्वात लहान फुलपाखराचा आकार अर्धा इंच इतकाच आहे. फुलपाखरे थंड रक्ताची असतात आणि त्यांच्या शरीराचे तापमान २९ डिग्रीवर गेल्याशिवाय उडू शकत नाहीत.
एका फुलपाखराला ८९-९८ असे नाव दिले गेले आहे. याचे कारण म्हणजे त्याच्या एका पंखावर ८९ आकड्याच्या आकाराची तर दुसऱ्या पंखावर ९८ आकड्याच्या आकाराची नक्षी असते. स्कीपर जातीचे फुलपाखरू घोडयापेक्षा वेगाने अंतर कापते. फुलपाखरांचे अस्तित्व पृथ्वीवर प्राचीन काळापासून आहे. ३५०० वर्षांपूर्वी इजिप्त मध्ये रेखलेल्या प्राचीन चित्रात फुलपाखरे चितारली गेलेली आहेत.