’83’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले एवढे कोटी


२४ डिसेंबर रोजी भारतातील जवळपास ३७४१ चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांची मुख्य भूमिका असलेला ’83’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. लग्नानंतरचा दीपिका आणि रणवीरचा हा पहिला एकत्र चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर २५ जून १९८३ रोजी भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. ’83’ हा चित्रपट याच विजयगाथेवर आधारित आहे. या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटात पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर जादू केली आहे. बॉक्स ऑफिस इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी ’83’ या चित्रपटाने १५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. नाताळ आणि विकेंड असल्यामुळे चित्रपटाची कमाई येत्या दोन दिवसांमध्ये वाढण्याची शक्यता आहे.

भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘८३’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा ही भारताने १९८३ साली जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या ऐतिहासिक विजयावर आधारित आहे. दीपिका पादुकोणने या चित्रपटात रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारली आहे.

दिग्दर्शक कबीर खान यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट सांभाळली आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.