सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्याला मथुरेतील संतांचा विरोध


अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘मधुबन में राधिका नाचे’ या गाण्यामुळे सनी लिओन चर्चेत आहे. प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद सनीच्या या गाण्याला मिळाला. सनीचे हे गाणे काहींना आवडले असले तरी अनेकांनी या गाण्याला विरोध केल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्यावर सनीने धम्माल डान्स केला असला तरीही तिच्या या डान्सला मथुरा येथील काही संतांनी विरोध करत, तिचा डान्स अश्लिल असल्याचे म्हटले आहे. यासोबतच सनीच्या गाण्यावर बंदी घालण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

मथुरा येथील संतांनी सनी लिओनच्या गाण्यावर आक्षेप घेतला आहे. या गाण्यावर सनी लिओनने अश्लिल डान्स केला आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचा आरोप सनीवर करण्यात आला आहे. यासोबतच सनीच्या या व्हिडीओ अल्बमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे आणि असे न केल्यास सनीच्या विरोधात खटला दाखल करण्यात येईल, असा इशाराही या संतांकडून देण्यात आला आहे.


२२ डिसेंबरला सनी लिओनचं ‘मधुबन में राधिका नाचे’ हे गाणे रिलीज झाले होते. प्रदर्शनानंतर हे गाणे काही वेळातच खूप व्हायरल झाले आणि त्यावरून सनीला खूप ट्रोल करण्यात आले होते. सनी ज्याप्रकारे या गाण्यावर डान्स करत आहे, त्याला अनेकांनी अश्लिल म्हटले आहे. आमच्यासाठी राधा पूज्यनीय आहेत आणि या गाण्यामुळे विशेषतः सनीच्या डान्समुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे या गाण्यावर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे.

‘मधुबन में राधिका नाचे’ हे एक अल्बम सॉन्ग आहे. या गाण्याच्या डान्सची कोरिओग्राफी प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनी केली आहे. वर्षाच्या अखेरीस हे गाणे हिट होईल असे निर्मात्यांना वाटले होते. पण हे गाणे आता दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसत आहे.