माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक अभिवादन


मुंबई : माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी देशाचे सर्वमान्य नेते होते. पंतप्रधान म्हणून देशाच्या निर्णयप्रक्रियेत, विकासप्रक्रियेत सर्वांना सहभागी करुन लोकशाही व्यवस्था बळकट करण्याचे काम त्यांनी केले.

भारतीय राजकारणाला उदारमतवादी, सुसंस्कृत चेहरा दिला. देशातील सर्व धर्म, पंथ, प्रांताच्या बंधु-भगिनींच्या मनात विश्वास निर्माण करणारे अटलबिहारी वाजपेयी आदर्श राजकारणी होते. देशाच्या या महान नेतृत्वास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.