यामुळे इस्त्रालयने ऑस्ट्रेलियन नागरिकाला ८००० वर्ष देश सोडण्यावर घातली बंदी


जेरुसलेम – एका ऑस्ट्रेलियन नागरिकाला इस्त्रालयने देश सोडून जाण्यावर बंदी घातली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ८ हजार वर्षांसाठी ही बंदी आहे. पण हे वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण न्यायालयानेच तसा आदेश दिला आहे. न्यायालयाने सुट्ट्यांसाठीही देशाबाहेर जाण्यास परवानगी दिलेली नाही. घटस्फोटाची पत्नीने केस दाखल केल्यानंतर स्थानिक न्यायालयाने हा आदेश दिला.

2013 मध्ये नोअम हुप्पर्ट (Noam Huppert) (४४) यांच्याविरोधात एका स्थानिक न्यायालयाने स्टे-ऑफ-एक्झिट जारी करत त्यांना ३१ डिसेंबर ९९९९ पर्यंत देश सोडण्यापासून रोखले होते. अन्यथा त्यांना भविष्य बाल समर्थन देयकामध्ये तीन मिलियन डॉलर्स एवढा रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला होता.

एका न्यूज रिपोर्टनुसार, एका फार्मास्युटिकल कंपनीसाठी नोअम हुप्पर्ट काम करतात. २०१२मध्ये आपल्या दोन मुलांच्या जवळ राहता यावे, यासाठी ते इस्त्रायलमध्ये गेले होते. यावेळी त्यांची पत्नी पुन्हा देशात परतली होती. देशात परत येताच तिने इस्त्रायलमधील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.

स्थानिक कायद्याला मानवाधिकार गटांनी कठोर आणि अतिरेकी असे संबोधले आहे. २०१३ पासून मी येथे बंदिस्त असल्याचे नोअम हुप्पर्ट यांनी news.com.au शी बोलताना सांगितले आहे. रिपोर्टनुसार, या कायद्यासंबंधी जनजागृती करण्याच्या हेतूने एक पत्रकार काम करत आहे. पण असे हजारो ऑस्ट्रेलियन नागरिक देशात अडकले असण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले आहेत. इस्त्रालयमधील घटस्फोट कायद्यात महिला सहजपणे आपल्या पतीच्या प्रवासावर बंदी आणू शकते. तसेच मुलांच्या संगोपनासाठी मदत मागू शकते, जी बालपण संपेपर्यंत मिळू शकते.