आनंद महिंद्रांना भावले टांझानियातील बहीण-भावाने बॉलिवूड गाण्यावर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन!


सोशल मीडियावर उद्योगपती आनंद महिंद्रा सक्रिय असतात. दररोज व्हिडिओ किंवा पोस्टच्या माध्यमातून व्यक्त होत असतात. त्याचबरोबर ते त्यांच्या काही पोस्ट प्रेरणा देणाऱ्या, तर काही पोस्टमधून कानउघडणी करताना दिसतात. नेटकऱ्यांना त्यांचा जबरदस्त अंदाज भावतो. त्यामुळे त्यांचे लाखो चाहते आहेत. एखादी पोस्ट त्यांनी टाकली की, त्यावर लाखोंच्या संख्येने लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो. आनंद महिंद्रा यांनी आता व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. टांझानियातील बहिण-भाऊ या पोस्टमध्ये बॉलीवूड गाणे गाताना दिसत आहे. तसेच त्यांचे जबरदस्त एक्स्प्रेशन त्यांना भावले असून त्यांनी व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनही लिहिली आहे.


हे बहीण भाऊ ‘रातां लंबियां…’ या बॉलिवूड गाण्याचे बोल गात नाचत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. किली पॉल नावाच्या युजर्सने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये किली पॉल त्यांची बहीण नेहमीप्रमाणेच त्याच्या पारंपरिक मसाई ड्रेसमध्ये दिसून येत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांना हा व्हिडिओ आवडला. बँडबाज्यावर मी उड्या मारत आहे. त्यांच्या वाढत्या फॅन क्लबमध्ये सहभागी होत आहे. त्यांचे एक्स्प्रेशनने माझा उत्साह वाढला असल्याचे कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिली आहे. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओला पसंती दिली आहे. तसेच वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच कमेंट्स करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.