यामुळे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे #Boycott83


आज देशातील चित्रपटगृहात अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘८३’ रिलीज झाला आहे. पण एकीकडे या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे आणि कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे ट्विटरवर ‘बॉयकॉट ८३’ असा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटावर बंद आणण्याची मागणी केली जात आहे. पण का याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

काही तास ‘८३’ चित्रपट रिलीज होऊन उलटत नाहीत, तोपर्यंत या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. दीपिका पादुकोणने आपला ‘छपाक’ चित्रपट रिलीज होण्याआधी जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना समर्थन दिले होते. याच कारणामुळे आता काही नेटकरी ‘८३’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करताना दिसत आहेत. अर्थात दीपिकाच्या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी तिच्या ‘छपाक’ चित्रपटावरही अशाप्रकारे बंदी आणण्याची मागणी करण्यात आली होती.

तसेच दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचे ‘८३’ चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी करणाऱ्यांमध्ये काहीजण हे चाहते आहेत. या चित्रपटासोबतच संपूर्ण बॉलिवूडला बॉयकॉट करण्याची मागणी सुशांतचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून करताना दिसत आहेत. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, एका अवॉर्ड सोहळ्याच्या वेळी रणवीरने सुशांतची खिल्ली उडवली होती. त्यामुळे ते त्याचा चित्रपट हिट होऊ देणार नाहीत.

दरम्यान भारताचे माजी क्रिकेट कर्णधार कपिल देव यांच्या जीवनावर आधारित रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेला ‘८३’ हा चित्रपट आहे. भारताने १९८३ साली मिळवलेल्या क्रिकेट विश्वचषकाच्या ऐतिहासिक विजयावर या चित्रपटाची कथा ही आधारित आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोणने रणवीरच्या ऑनस्क्रीन पत्नीची म्हणजेच कपिल देव यांची पत्नी रोमी भाटिया यांची भूमिका साकारली आहे.