‘गदर’च्या सिक्वेलमधील सनी देओलचा फर्स्ट लूक रिलीज


आपल्या दमदार अभिनयामुळे अभिनेता सनी देओलने बॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. ‘बेताब’ चित्रपटातून सनी देओलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण त्याला खरी लोकप्रियता ‘गदर’ चित्रपटातून मिळाली. सनी देओलचे या चित्रपटातील स्टंट आणि डायलॉग्सनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गदर २’च्या शूटिंगचे पहिले शेड्युल पूर्ण झाले असून सनी देओलने आपल्या इन्स्टाग्रामवर चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.


आपल्या इन्स्टाग्रामवर सनी देओलने ‘गदर २’चा फर्स्ट लूक शेअर केला आहे. २० वर्षांनंतर ‘तारा सिंग’ किती बदलला हे देखील या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. सनी देओल या फोटोमध्ये डोक्याला पगडी बांधून शेकोटीजवळ बसलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सनीने असे म्हटले आहे की, नशिबवान लोकांनाच आयुष्यातील एक खास व्यक्तीरेखा पुन्हा साकारण्याची संधी मिळते.

सनीने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले, गदर २ चित्रपटाचे पहिले शेड्युल पूर्ण झाले आहे. सनी देओलच्या या पोस्टवर चाहत्यांच्या उत्स्फुर्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी सनीचे कौतुक करत त्याला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या चित्रपटात सनी देओलसोबत अभिनेत्री अमिशा पटेल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सनी आणि अमिशाची मुख्य भूमिका असलेल्या ‘गदर’ चित्रपटाला जून २०२१ रोजी २० वर्षं पूर्ण झाली होती.