कोरोनाच्या पार्श्वभूमीवर H-1B, L-1 व्हिसा नियमांत अमेरिकेकडून बदल


वॉशिंग्टन – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या बाधितांच्या आकडेवारीत सध्या झपाट्याने वाढ होत आहे. अमेरिकेने याच कारणास्तव गुरुवारी वर्किंग व्हिसा H-1B, L-1 आणि O-1 साठी पर्सनल इंटरव्यूमधून सूट दिली आहे. आपल्या एका परिपत्रकात परराष्ट्र विभागाने असे म्हटले की, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे व्हिसाधारकांना आपला व्हिसा रिन्यू करण्यापूर्वीच्या इंटरव्यू द्यावा लागणार नाही आहे. आता जगभरातील अर्जदारांना या निर्णयानंतर दिलासा मिळणार आहे.

परिपत्रकात असे ही म्हटले की, याबद्दल घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. कारण कांउंसिलर अधिकाऱ्यांनी अस्थायी रुपात मंजूरी दिली असून ते 31 डिसेंबर, 2022 पर्यंत संबंधित श्रेणींमध्ये काही व्यक्तिगत याचिकेच्या आधारावर नॉन-इमिग्रंट वर्क व्हिसासाठी वैयक्तिक इंटरव्यू मधून सूट दिली जाईल. यामध्ये एच-1 बी व्हिसा, एच-3 व्हिसा, एल व्हिसा, ओ व्हिसा यांचा समावेश आहे. विभागाच्या वीजा प्रोसेसिंग क्षमतेत कोरोनाच्या स्थितीमुळे घट झाली आहे. ज्या प्रमाणे जागतिक प्रवास पुन्हा सुरु होत आहे त्यानुसार आम्ही हे अस्थायी पाऊल उचलत आहोत.

दुसऱ्या देशांमधून अमेरिकेतील कंपन्यांमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना H1B व्हिसा दिला जातो. तर कामानिमित्त ज्यांना येथे रहावे लागते, त्यांनाच हा व्हिसा मिळतो. हा व्हिसा एका मर्यादित कालावधीसाठी दिला जातो. परंतु त्याची मुदत संपल्यानंतर तो अर्जदाराला रिन्यू करावा लागतो. म्हणजेच अमेरिकेतील कंपन्या जर एखाद्या विदेशातील नागरिकाला नोकरी देऊ इच्छिते, तर त्याला या व्हिसाच्या माध्यमातू काम करता येते.