महाराष्ट्रातील या शहरात लसीकरण झाले असेल तरच मिळणार प्रवेश


नाशिक : राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख पुन्हा वाढत आहे. गेल्या 35 दिवसांनंतर पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या एक हजारहून अधिक झाली. मुंबईत काल दिवसभरात 490 जणांसह राज्यात 1201 कोरोनाबाधित आढळले आहेत. दरम्यान, नाशिकमध्येही कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे नाशिक शहरात आजपासून नो व्हॅक्सिन नो एंट्री नियम लागू करण्यात आला आहे.

आजपासून नाशिक शहरात नो व्हॅक्सिन नो एंट्री ही मोहीम सुरू झाली आहे. तर नाशिक शहरात जागोजागी तपासणी होणार आहे. एसटी, रेल्वे, खासगी वाहतूक सेवा, पर्यटनस्थळे, हॉटेल, रिसॉर्ट, दुकाने, मॉलमध्ये सातत्याने तपासणी होणार आहे. तसेच पेट्रोल पंप, बाजार समिती, कार्यालयात केवळ लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळेल. आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.