शाओमी १२ स्मार्टफोन सिरीज फीचर्स लिक

चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमी त्यांची शाओमी १२ स्मार्टफोन सिरीज २८ डिसेंबर रोजी सादर करत आहे. मात्र त्यापूर्वीच या स्मार्टफोन संदर्भात जबरदस्त क्रेझ दिसून आली आहे. या स्मार्टफोनची अनेक फीचर्स लिक झाली असून शाओमीने डिस्प्ले बाबत झालेल्या लिकला पुष्टी दिली आहे.

लिक्सनुसार शाओमी १२ सिरीज मध्ये किमान तीन हँडसेट सादर केले जातील. बेसिक व्हेरीयंट शाओमी १२ आणि १२ प्रो तसेच मिनी अशी ही व्हेरीयंट असतील असे समजते. छोट्या आणि मोठ्या दोन्ही मॉडेल साठी ६.२८ इंची डिस्प्ले आणि क्वालकॉम चीपसेट असेल. या फोन साठी अँड्राईड १२ ओएस दिली जाईल असेही समजते. १२ जीबी रॅम, ५१२ जीबी स्टोरेज आणि खास कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे. युजर्स त्यामुळे अधिक वेगाने फोटो काढू शकतील. इतकेच नाही तर मुव्हिंग ऑब्जेक्ट स्टेबल असल्याप्रमाणे फोटो कॅप्चर करता येतील. सध्याच्या कुठल्याच स्मार्टफोन मध्ये हे फिचर नाही.

सिरीज १२ सध्या फक्त चीन मध्ये सादर होणार आहे. डिस्प्लेचे डिझाईन कर्व्ड आहे आणि फोनचा एकूण आकार कॉम्पॅक्ट आहे. रिअरला ५० एमपीच्या प्रायमरी कॅमेरयासह दोन कॅमेरे असतील तर सेल्फी साठी ३२ एमपीचा फ्रंट कॅमेरा असेल.फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी बॅटरी दिली जात असून या फोनची भारतातील किंमत साधारण ५० हजार रुपये दरम्यान असेल असे समजते.