या सर्वात जुन्या चर्च मध्ये ६ जानेवारीला साजरा होतो नाताळ
दरवर्षी जगभरात नाताळचा सण २५ डिसेंबर रोजी साजरा होतो. क्रिश्चन आणि बिगर ख्रिश्चन सर्व लोक मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात. याच दिवशी येशूचा जन्म झाला असा समज आहे. त्यासाठी घरातून, चर्च मधून सजावट केली जाते, दिवे लावले जातात, मेजवान्या दिल्या घेतल्या जातात. देवदूत सान्टाक्लॉज या दिवशी घराघरात जाऊन लहान मुलांना गिफ्ट आणि चॉकलेट देतो अशी प्रथा पाळली जाते. सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू पोप या दिवशी संबोधन करतात.
मात्र जगातील सर्वात जुने किंवा प्राचीन चर्च मानल्या जाणाऱ्या अर्मेनियन चर्च मध्ये नाताळ २५ डिसेंबरला नाही तर ६ जानेवारीला साजरा होतो याची माहिती अनेकांना नाही. ख्रिस्चन धर्माची सुरवात येशूच्या जन्मानंतर झाली. त्याचवेळी आर्मेनियन अपोस्टोलिक चर्च बांधले गेले. चौथ्या शतकात राजा तीरीडेटस याने आर्मेनिया धर्मगुरु किंवा कॅथोलिक म्हणून ग्रेगरी याच्या नावाची घोषणा केली होती. ग्रेगरीने येशूला पृथ्वीवर येताना पाहिले होते असा समज आहे. तेव्हा येशूच्या हातात हातोडा होता.
या ग्रेगरीने त्याच जागी चर्च बांधा असा सल्ला राजाला दिला. त्या जागी खोदल्यावर अगोदरच असलेले एक विशाल मंदिर उजेडात आले. हेच ते सर्वात जुने चर्च. स्थानिक लोकांचा या प्रकारामुळे येशू वरचा विश्वास वाढला. येशूच्या जन्माची नक्की तारीख कुठेच नोंद नाही. या देशात ६ जानेवारी हा येशूचा जन्मदिवस मानला जातो. त्यामुळे येथे आजही ६ जानेवारीला नाताळ साजरा होतो.