योग्य उपाययोजना केल्यास ओमिक्रॉन संपुष्टात येईल – बिल गेट्स


वॉशिंग्टन : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणाऱ्या बिल गेट्स यांनी योग्य उपाययोजना केल्यास ओमिक्रॉन संपुष्टात येईल, असे म्हटले आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे संकट जगभरात अधिक वाढत चालले आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन अधिक वेगान पसरताना पाहायला मिळत आहे. ओमिक्रॉनचे भारतातही वाढते संकट आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांकडून काळजी घेण्याचे आवाहन आणि धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. आता जगातिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक बिल गेट्स यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.

बिल गेट्स यांनी आपल्या ट्विट म्हटले आहे की, अतिशय वेगाने ओमिक्रॉन पसरत आहे. पण ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यामध्ये चांगली बातमी अशी आहे की, एकदा तो एखाद्या देशात प्रबळ झाला की तेथील लाट तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी असतो. ते काही महिने वाईट असू शकतात, परंतु मला अजूनही विश्वास आहे की जर आपण योग्य पावले उचलली तर 2022 मध्ये साथीचा रोग संपुष्टात येईल.

ओमिक्रॉनबाबत बिल गेट्स यांनी धोक्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी म्हटले की, ओमिक्रॉन व्हेरिएंट अतिशय वेगाने पसरत आहे. लवकरच हा ओमिक्रॉन जगभरातील कानाकोपऱ्यात कहर माजवेल. बिल गेट्स यांनी ओमिक्रॉनचा वाढता धोका पाहता ख्रिसमसनिमित्तचे आपले बहुतेक कार्यक्रम आणि सुट्ट्या रद्द केल्याचे सांगितले आहे. त्यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटला गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले आहे.

यासंदर्भात बिल गेट्स यांनी ट्विट करत म्हटले आहे की, जेव्हा असे वाटत होते की जीवन पूर्वीप्रमाणे सामान्य होईल, तेव्हाच आपण साथीच्या आजाराच्या अधिक गंभीर प्रकारात प्रवेश करतो. लवकरच ओमिक्रॉन घराघरात पोहोचेल. माझ्या जवळच्या मित्रांनाही ओमिक्रॉनची लागण झाल्यामुळे मी नवीन वर्षानिमित्तच्या माझ्या बहुतेक सुट्ट्या आणि कार्यक्रम रद्द केले आहेत.