मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवारांकडे दिली, तर ते चारच दिवसात राज्य विकून मोकळे होतील


मुंबई – काहीश्या तापलेल्या वातावरणातच राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सुरूवात झाली. भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत सुरुवात झाल्यामुळे सत्ताधारी पक्षावर चांगलाच निशाणा साधला. या टीकेला चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने सुरूवात झाली. त्यानंतर प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर अशा अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका केली. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांकडे दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत ४ दिवसांत राज्यच विकून मोकळे होतील, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी हजर राहू शकले नाहीत. काही काळ त्यांनी घरी बसून विश्रांती घ्यावी. काही काळ मुख्यमंत्रिपदाचा भार आदित्य ठाकरे किंवा अजित पवारांकडे सोपवावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. राज्य गेल्या दीड-दोन महिन्यांपासून अधांतरी असल्याचेही बोलले जात आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्यावरूनच अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. जर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अजित पवारांना दिली, तर ते अधिवेशन संपायच्या आत, चारच दिवसात राज्य विकून मोकळे होती, असे वक्तव्य पडळकर यांनी केले आहे.