पाक, चीन सीमेवर भारत बनवितोय स्वदेशी भूसुरुंग संरक्षण रेषा

स्वदेश बनावटीचे सुमारे सात लाख भूसुरुंग वापरून भारत, पाकिस्तान आणि चीन सीमेवर पहिली संरक्षण रेषा बनविणार आहे. मानवी घुसखोरी रोखण्यासाठी बनविले जात असलेले हे भूसुरुंग आरडीएक्सच्या मिश्रणातून बनविले जात असून डीआरडीओने खासगी क्षेत्रातील कंपनीच्या सहकार्याने ते विकसित केले आहेत. थलसेना अध्यक्ष एम एम नरवणे यांनी ही माहिती मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना दिली.

नरवणे म्हणाले, याच प्रकारे स्वदेशी विभव आणि विशाल अँटी टँक सुरुंगांचे परीक्षण अॅडव्हांस रेंजवर सुरु आहे. हे सुरुंग सुद्धा सीमेवर लावता येणार आहेत. भारताने बनविलेल्या कवचयुक्त अभियांत्रिकी गस्ती वाहनाच्या ५३ पैकी १४ वाहने सेनेत सामील केली गेली त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते त्यात नरवणे बोलत होते. ते म्हणजे विपुल, विभव आणि विशाल शिवाय अन्य काही प्रकारचे सुरुंग सुद्धा सेनेत भविष्यात वापरत आणले जाणार असून त्यातील प्रचंड, उल्का आणि पार्थ हे प्रमुख आहेत.