केआरकेचा खुलासा; एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा घेतो एवढे पैसे


नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान चर्चेत असतो. बॉलिवूड सेलिब्रिटींविषयी तो नेहमीच अनेक खुलासे करताना दिसतो. पण, त्या गोष्टी किती बरोबर आहे, हे सांगता येणार नाही. विनोदवीर कपिल शर्मा विषयी आता केआरकेने एक खुलासा केला आहे. त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल मोठी रक्कम घेतो.


हे ट्वीट केआरकेने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे. त्याने यात एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत आपल्या शोमध्ये एका चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कपिल शर्मा २५ लाख रुपये घेतो, असे सांगितले आहे. तर केआरके म्हणाला, कपिलच्या शोची टीआरपी वाढवण्यासाठी ते तिथे जातात. कपिलच्या शोमध्ये प्रमोशन करून काही होत नाही.

केआरके पुढे म्हणाला, कपिल शर्मा एक बिचारा कॉमेडियन आहे. तो एक छोटासा अभिनेता आहे. तर त्याच्या शोमध्ये कोणत्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे असेल, तर निर्मात्यांना ५० लाख रुपये द्यावे लागतात. पुढे केआरके म्हणाला की तुम्हाला कळलेच असेल मी कोणत्या मोठ्या सेलिब्रिटीच्या शोबद्दल बोलत आहे.